
सामना प्रतिनिधी । कासार बालकुंदा
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील शंकर वैजिनाथ बुग्गे यांच्या शेतातील सोयाबीनच्या बनी मिला आग लागल्याने दोन लाखाचे सोयाबीन जळून खाक झाले आहे. शंकर वैजनाथ बुग्गे यांच्या शेतामध्ये सहा बॅग सोयाबीनच्या काड शेताच्या कोपऱ्यामध्ये जमा करण्यात आले होते. दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी बारा ते एकच्या दरम्यान शेता मधून अचानक आग लागलेली पाहायला मिळाल्याने शंकर व कुटुंबातील व्यक्ती शेताकडे गेले असता संपूर्ण सोयाबीनची बनिम जळून खाक झालेले होते.
शंकर वैजनाथ बुग्गे यामुळे मोठे नुकसान झालेले आहे तसेच गेल्या वर्षी देखील पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामासाठी घेतलेली दोन मोठी बैल जवळजवळ एक लाख रुपयाचे मरण पावले. त्या संकटातून शंकर सावरते न सावरते तेवढ्यातच दहा दिवसा अगोदर एक म्हैस मरण पावले. त्यानंतर लगेच हा प्रकार घडल्याने शेतकरी असणारा शंकर बुगे यांच्यावरती आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. शासनाकडून याला आर्थिक मदत व्हावी अशी मागणी समस्त गावकरी करून चर्चिले जात आहे.
घडलेली घटना कळताच कासार शिरशी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय समाधान कवडे व मन्थम धुमाळ, घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास करणे सुरू आहे.
































































