हिंदुस्थानला उपविजेतेपद, सुलतान जोहर चषक हॉकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । क्वालालंपूर

मलेशियात सुरू असलेल्या सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत हिंदुस्थानी युवा हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत इंग्लंडने हिंदुस्थानवर 3-2 अशी मात करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत हिंदुस्थानने कास्यपदकाची कमाई केली होती. इंग्लंडच्या युवा संघाचे हे दुसरे विजेतेपद ठरले आहे. पहिल्या सत्रापासून हिंदुस्थानी फॉर्वर्डस्नी आक्रमक खेळ करायला सुरुवात केली होती. अखेरच्या सत्रात इंग्लंडने आक्रमक खेळ करीत 3-2 च्या फरकाने सामना जिंकत इंग्लंडने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

summary- india became runner up in sultan johor cup trophy