शिवसेना देवपूर पश्चिम विभागाचा आज मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, धुळे

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. शिवसेनेला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मजबूत मोर्चेबांधणीला केव्हाच सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतर्फे जनतेच्या प्रश्नांवर विविध आंदोलने, घेराव, धरणे व निवेदने देणे सुरू आहे. त्यामुळे शहरामध्ये शिवसेनेचे वातावरण अत्यंत चांगले झाले आहे.

शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख के.पी. नाईक यांनी वार्डा-वार्डात बैठका घेऊन बुथ प्रमुखांची नेमणुका केल्या आहेत. शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील नेमणुका झाल्याने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा पाडाव करण्यासाठी शिवसेना सिद्ध झालेली आहे. त्या अनुषंगाने शिवसेना देवपूर पश्चिम विभागाचा मेळावा 16 ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता गुरुदत्त मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय तुळशीराम नगर, देवपूर, धुळे येथे आयोजित केलेला आहे.

या मेळाव्यास पश्चिम देवपूर भागात येणारे प्रभाग क्रमांक 1, 5, 4 व 6 चा काही भाग येत असून या प्रभागातील इच्छुक उमेदवार, शिवसैनिक व पदाधिकाऱयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपशहरप्रमुख प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, संजय पाटील, भगवान आप्पा गवळी, भटू गवळी, डॉ.अहिरराव, दिगंबर चौधरी, राजेश पाटील, किशोर माळी, राजन शिंदे, गोपाल सैंदाणे, नितीन महाले, संतोष गवळी, ईश्वर लोणारी, विजय दंगल, भटू घटी, उज्ज्वल वाळके व नकाणे गावातील प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, अनिल पाटील, बिपीन पाटील, गुलाब पाटील तसेच वाडीभोकर भागातून मुकेश खरात, प्रवीण पाटील, राजन वाघ, योगेश पाटील, मनोज ढिवरे, पवन पाटील, मयूर देसले, सुदाम शिरुड, अरुण धुमाळ यांनी केले आहे.

या मेळाव्यास संपर्कप्रमुख के.पी. नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, विजय भट्टड, डॉ. सुशील महाजन, महेश मिस्तरी, भगवान करनकाळ, बापुदादा शार्दुल, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, वैशाली लहामगे उपस्थित राहणार आहेत.

summary- gathering of shivsena devpur west region