बलात्काराच्या आरोपातून तब्बल 30 वर्षांनंतर निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

तब्बल 30 वर्षांपूर्वी घडलेल्या एका बलात्काराच्या प्रकरणातून मुंबई सत्र न्यायालयाने आज एका 46 वर्षे वयाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. 17 वर्षे वयाच्या तरुणीशी तिच्या संमतीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या या व्यक्तीचे वय त्यावेळी फक्त 16 वर्षे होते. त्याकाळी 16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलीसोबत तिच्या समतीने शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा नव्हता. कायद्यातील या तरतुदीचा हवाला देत मुंबई सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश पी. व्ही. गनेडीवाला यांनी या व्यक्तीला निर्दोष ठरवत त्याची सुटका केली.

एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी त्यावेळी अवघे 16 वय असलेल्या या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याहून 1 वर्षाहून मोठय़ा असलेल्या मुलीला फूस लावून पळवून नेणे व त्यानंतर तिच्यावर बलात्कार करणे असे या तरुणावर आरोप ठेवण्यात आले होते.

तब्बल तीस वर्षांपूर्वी घडलेल्या या घटने प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. त्यावेळी सध्या 46 वय असलेल्या मुलाने मुलीच्या संमतीनेच तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या व्यक्तीने आपल्यावर बलात्कार केलेला नसून माझ्या सहमतीनेच त्याने माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्याची कबुली खुद्द या मुलीने न्यायाधीशांसमोर दिले. त्यामुळे न्यायालयाने या व्यक्तीला निर्दोष सोडून दिले.

summary- an accuse of rape case declared innocent after 30 years