
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना विभाग क्रमांक- 6 मधील कुर्ला विधानसभेचे उपविभागप्रमुख ऍड. उमेश पाटील यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
ऍड. उमेश पाटील यांच्या फुप्फुसात जंतू संसर्ग झाल्याने दीड महिन्यापासून त्यांच्यावर माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावत गेल्याने रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कुर्ला पश्चिम येथील सोनापूर लेन येथे असलेल्या हिंदू स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुरुवातीपासूनच शिवसेनेत कार्यरत असलेले पाटील शिवसैनिकांना नेहमी कायदेविषयक मदत करत. तसेच वेगवेळ्या आंदोलनांत शिवसैनिकांवर दाखल झालेल्या केसेस ते लढवत.
summary- adv umesh patil passes away






















































