सावरगावात भगवानबाबांच्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhagwan-baba-beed

उदय जोशी । बीड

दसरा मेळाव्याला श्री क्षेत्र सावरगाव इथे संत भगवान बाबा यांची 25 फूट उंचीची भव्य-दिव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. ज्या चौथऱ्याचे भव्य मूर्तीची उभारणी होणार आहे ते काम अंतिम टप्यात आहे, पाण्यावर धोतर अंथरून श्री संत भगवानबाबा ज्ञानेश्वरीचे वाचन करत आहेत अशी प्रतिकृती सावरगाव घाट येथे पूर्णत्वास जात आहे.

18 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्यात सावरगाव तालुका पाटोदा येथे भगवान बाबांची मूर्ती उभी केली जाणार आहे. त्यासाठी बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगावमध्ये मोठ्या चौथऱ्याची उभारणी युद्ध पातळीवर केली जात आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अहोरात्र सुरू आहे. या कामावर स्वतः माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार देखरेख करत आहेत. चौथाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, चौथाऱ्याला ऐतिहासिक लूक देण्यात आला आहे, बाबा पाण्यावर तरंगणाऱ्या धोतरावर बसून ज्ञानेश्वरी चे वाचन करत आहेत अशी प्रतिकृती तयार होत आहे, दसरा मेळाव्यात या कामाचे लोकार्पण पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.