डेंग्यू- मलेरियाला हद्दपार करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतून डेंग्यू-मलेरियाला हद्दपार करण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम सुरू केली असून धूम्रफवारणीसाठी पालिका 42.29 कोटी रुपयांची दर्जेदार कीटकनाशके खरेदी करणार आहे. आजारांना आळा घालणारी ही कीटकनाशके दोन वर्षांमध्ये धूम्रफवारणीसाठी वापरली जाणार असून या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. तरीदेखील वातावरणात अचानक होणारे बदल आणि दूषित हवामानामुळे अनेक वेळा डेंग्यू-मलेरिया डोके वर काढतात. या पार्श्वभूमीवर पुढील दोन वर्षांकरिता डेंग्यू-मलेरियाला आळा घालणाऱ्या कीटकनाशकांची खरेदी करून धूम्रफवारणी केली जाणार आहे. यामध्ये ‘पायरेथ्रम एक्स्ट्रक्ट 2 टक्के’ या कीटकनाशकाची खरेदी केली जाणार आहे. एक लिटर ‘पायरेथ्रम एक्स्ट्रक्ट’ साठी पालिका 1,940 रुपये याप्रमाणे 2,18,000 लिटर ‘पायरेथ्रम एक्स्ट्रक्ट’ साठी 42.29 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी कंत्राटदार मे. रमेश एग्रोकेम कॉर्पेरेशनला काम देण्यात आले आहे.

तर कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकणार

स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या प्रस्तावानुसार कंत्राटदाराला वर्षातून तीन वेळा कीटकनाशकांचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. कंत्राटदाराने पुरकठा केलेल्या कीटकनाशकांची प्रत्येकवेळी तपासणी करण्यात येईल. जर कंत्राटदाराने कीटकनाशकांचा पुरवठा योग्यरीत्या केला नसल्याचे आढळल्यास किंवा कीटकनाशक समाधानकारक नसल्यास संबंधित कंत्राटदाराला पहिल्या चुकीसाठी एकूण खरेदी रकमेच्या 20 टक्के दंड केला जाईल तर दुसऱया वेळी चूक झाल्यास कंत्राटदाराला तीन कर्षांसाठी काळय़ा यादीत टाकण्यात येणार आहे.