द इंडियन हॉटेल्स तर्फे राजेशाही थाट अनुभवण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

राजेशाही प्रासादांचा वारसा व भव्यता आणि राजघराण्यांच्या विस्मयकारी जीवनशैली आणि हिंदुस्थान असे समीकरण अनंत काळापासून आपण पाहतो. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या स्थळांनी जागतिक पर्यटन नकाशावर हिंदुस्थानसाठी खास स्थान निर्माण केले आहे. यातील अनेक वास्तूंचे हेरिटेज हॉटेल्सच्या स्वरुपात पुनरुज्जीवन आणि जतन करण्यात आले आहे.  आता या राजेशाही प्रासादात राजेशाही थाटात सुटी घालवण्याची संधी इंडियन हॉटेल्स कंपनेनी दिली आहे.

मैद भवन पॅलेस, ताज लेक पॅलेस, ताज रामबाग पॅलेस, ताज फलकनुमा पॅलेस अशा ऐतिहासिक स्थळांचा यामध्ये समावेश असून पर्यटकांना अशा ऐतिहासिक राजवाड्यांमध्ये राहण्याचा आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा कंपनीतर्फे नुकतीच करण्यात आली.

या पॅकेजमध्ये पर्यटकांना दोन रात्रींसोबत एक रात्र मोफत देण्यात आली असून ऐतिहासिक अशा राजवाड्यांमध्ये अधिक काळ राजेशाही वास्तव्य करण्याची संधी यामुळे पर्यटकांना मिळणार आहे. ही सवलत ३० ऑक्टोबर पर्यंत लागू असणार असून अधिक माहितीसाठी www.tajhotels.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन ताज पॅलेस ग्रुप ऑफ हॉटेल्सतर्फे करण्यात आले आहे.