
सामना ऑनलाईन । कर्जत
कर्जत रेल्वे स्थानकाजवळ करायकल एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे, मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरू आहे. कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटलेली करायकल एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने जात असताना कर्जत रेल्वे स्थानकाजवळ इंजिनमध्ये बिघाड झाला होता. जवळपास दीड तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण धाल्यानंतर करायकल एक्सप्रेस मार्गस्थ झाली.



























































