शिक्षण सोडुन विद्यार्थी तहसीलच्या दारी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

गेल्या काही वर्षापासुन  शाऴेच्या शेजारील व्यक्ती सतत ऑनलाईन विविध प्रकारच्या तक्रारी करतो,या सर्व प्रकारामुऴे  शाऴेतील शिक्षकावर दडपण येत आहे. येथील मुख्याध्यापक पदाचा पदभार कोणीही घेण्यास तयार नाही. या बाबी मुऴे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत असल्याने संबंधितावर योग्य ती कारवाई ची मागणी साठी १०७ विद्यार्थैसह गावकरेनी तहसील कार्यालय समोर उपोषण केले.

शहरा लगत असलेल्या बेलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ही आयएसओ मान्यता प्राप्त आहे. शाळेच्या बाजूस  गिरी नामक व्यक्तीचे घर आहे. तो सतत शाळे विरूद्ध तक्रारी करतो व शाळेतील कंपाऊडच्या मधुन रस्ता सोडा म्हणत शिक्षकांना बोलतो त्यामुऴे याचा परिणाम शिक्षणावर होतो. या व्यक्तीवर  कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्त व विद्यार्थी तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले होते.

या वेळी नायब तहसीलदार गणेश जाधव यांनी संबंधित व्यक्ती व गावकरी, शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करुन उपोषण सोडले यावेळी गणेश नारायणकर, नगरसेवक विजय जोशी, बांमदळे, गटशिक्षणधिकारी गव्हाणे सर्व पत्रकार गावकरी उपस्थित होते.