कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुखेड

मुखेड तालुक्यातील होंडाळा येथील शेतकरी रमेश लक्ष्मण धनवाडे (४०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.

सदर घटना दिनांक २३ ऑक्टोबर रोज मंगळवार रात्री घडली. रमेश धनवाडे यांना उपचारासाठी मुखेडला आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रमेश धनवाडे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे २५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे कळते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. मयत शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी आ.डॉ. तुषार राठोड, शिवसेनेचे व्यंकट लोहबंदे, बालाजी पाटील कबनूरकर, शहर प्रमुख नागनाथ लोखंडे, शामसुंदर शिंदे यांनी केली आहे.