
सामना ऑनलाईन, पिंपरी
पिंपरी शहरातील दळवीनगर भागात असलेल्या झोपडपट्टीला आग लागली. या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर अशी आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या आगीमध्ये पाच झोपड्या जळून खाक झाल्याचंही सांगण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली होती.
ही घटना आज (गुरुवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास लागली.
संजय क्षीरसागर (वय 35), प्रदीप मोटे (वय 32) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे दळवीनगर झोपडपट्टीमधील एका घराला अचानक पहाटेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत झोपडपट्टीमधील काही घरे जाळून खाक झाली. तसेच घरामध्ये गाढ झोपलेल्या दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. गॅस लिकेज होऊन आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.



























































