जम्मू-कश्मीर: दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
army_jawan
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद्यांची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी हिंदुस्थानी लष्करानं कारवाईचा जोर कायम ठेवला आहे. आज पहाटे सोपोर भागात लष्कराची दहशतवादीसोबत चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या भागात अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी जम्मू-कश्मीरात त्राल येथे हिंदुस्थानी लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात एक जवान शहीद झाला होता तर एक जवान गंभीर जखमी झाला होता.