
सामना ऑनलाईन । मुंबई
मालाड येथील मढमध्ये असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे तिथे असलेला एक मोबाईल टॉवरही जळून खाक झाला आहे. या आगीत जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलेलं नाही. सविस्तर बातमी थोड्याच वेळात































































