अंढेरा दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी पोलिसांना शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

बहुचर्चित अंढेरा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी गोरख शिंदे अखेर स्थानिक गुन्हे शाखेला शरण आला आहे. यापूर्वी पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

134 जणांच्या निवडणूक यादीतून लावला मृतकाचा तपास, तीन आरोपी गजाआड
बुलढाण्यात दुहेरी हत्याकांड, हत्येनंतर दगडाने ठेचून चेहरे केले विद्रूप

21 सप्टेंबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत खडका शिवारामध्ये दोन मृतदेह मिळून आले होते. त्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचेकडे दिला होता. सुरुवातीलाच सदर गुन्ह्यातील मयतांची ओळख पटविणे हे जिकिरीचे काम होते. अत्यंत प्रयत्नपूर्वक यातील मयत मधुकर गोरोबा घोलप व परमेश्वर बबरुवान घोलप दोन्ही रा. सिंधी जवळगा, जि. लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने, कसोसीने व तांत्रिकदृष्ट्या तपास करुन यातील तीन आरोपी नाते शेख मुस्तफा उस्मान साब शेख, मधुकर मारोती लहाने, संदीप निवृत्ती पवळे यांना अत्यंत शिताफीने अटक करण्यात आली होती. त्यांचेकडे अधिक तपास करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. परंतु यातील मुख्य सूत्रधार गोरख कुंडलीक शिंदे, रा. निलंगा, जि. लातूर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली. परंतु तो पोलिसांना मिळून आला नाही. अखेर शुक्रवारी पोलिसांच्या ससेमिर्‍याला कंटाळून तो बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला शरण आला. त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थागुशाचे पो.नि. महेंद्र देशमुख करीत आहे.