
>>शुभांगी बागडे<<
गेली सहा दशके ज्यांच्या सुरांनी आणि शब्दांनी अनेक पिढय़ा मंतरल्या असे गानयोगी म्हणजे यशवंत देव. एका सात्विक, सुशील कुटुंबातून आलेल्या यशवंतरावांनी मराठी भावसंगीतात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. त्यांचा हा प्रवास बाहेरून जितका रम्य दिसतो तितकाच तो अंतर्मुखही करतो. यशवंत देव यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू होते. यशवंत देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते, पण त्यातही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. यशवंतरावांच्या सांगीतिक जडणघडणीत त्यांच्यावर बालपणात झालेल्या संस्कारांचा वाटा मोठा आहे. वडिलांचे संस्कार यशवंतरावांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वात रुजवले. म्हणूनच यशवंतराव नेहमी म्हणत की वडिलांनी संगीताचं बाळकडू तोंडात घालण्याऐवजी कानात घातलं होतं. यशवंतरावांनी वडिलांकडून बरंचसं संगीत आत्मसात केलं. मराठी भावगीतांच्या इतिहासात यशवंत देव यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मराठी भावसंगीतावर त्यांनी अमीट ठसा उमटवला आणि रसिकांना त्यांच्या चालींनी भरभरून आनंद दिला. सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर 1951मध्ये ते सतारवादक म्हणून एच.एम.व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांना त्यांनी गुरुस्थानी मानले. गीतातील भावार्थाची लय नेमकी पकडणारे संगीत अनिल विश्वास देतात आणि ते प्रचलित संगीतकारांपेक्षा निराळे आहेत, असे सांगत त्यांनी गुरुनिष्ठा कायम जपली. आकाशवाणी केंद्राच्या धारवाड, नागपूर व मुंबई सुगम संगीत विभागात त्यांनी तीस वर्षांची दीर्घ सेवा केली. हा काळ त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ ठरला. आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम गाजले. आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागात सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या नंतरच संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’, ‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा मंत्र’ असे कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. आकाशवाणीच्या नोकरीच्या निमित्ताने लाभलेला थोरामोठय़ांचा सहवास आणि ‘भावसरगम’सारख्या कार्यक्रमातून अनेक उत्तमोत्तम मराठी भावगीते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी याबाबतची कृतार्थता ते अनेकदा व्यक्त करीत. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्यांनी संगीतकार म्हणून अनेक अविस्मरणीय गाणी दिलीच, पण याबरोबरच गीतकार-कवी म्हणून त्यांची ओळखही रसिकांना भावली. त्यांची अरे देवा तुझी मुले, कोटी कोटी रूपे तुझी, जीवनात ही घडी अशीच राहू दे, तू नजरेने हो म्हटले, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी अशी अजरामर गाणी त्यांनी लिहिली. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीकनात ही घडी’, ‘स्कर आले दुरुनी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ अशा शेकडो गीतांना त्यांनी संगीतसाज चढवला. संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. ज्या गाण्यातून केवळ मनोरंजन न होता भावसंकेत निर्मिती होते ते गाणे किंवा कविता म्हणजे भावगीत अशी ते भावगीताची व्याख्या करीत. रचल्या जाणाऱ्या गीतातील भावार्थ त्यांनी शेवटपर्यंत जपला आणि म्हणूनच त्यांच्या गाण्यांची गोडी आणि लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. भावगीतांच्या या सफरीत त्यांच्यावर गजानन वाटवे यांचा फार प्रभाव राहिला. जी. एन. जोशी आणि गजाननराक काटके यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले होते. विविध संस्थांकडून मिळालेले 25हून अधिक पुरस्कार, 15 चित्रपटांचे संगीतकार, 43 नाटकांसाठी गीत व संगीत दिग्दर्शन, 45 ध्वनिफिती, आल्बम यांना संगीत असे भरीव योगदान देव यांनी मराठी संगीताला दिले. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरक पुरस्कार अशा किकिध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. यशवंत देवांनी भावसंगीताचं विश्व समृद्ध केलं होतं. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही संगीत दिलं होतं. मराठी चित्रपटगीत, नाटय़पद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्या संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला अमीट ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने मराठी संगीतक्षेत्राकर अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.





























































