मराठवाड्यासाठी आनंदवार्ता! नगरमधून पाणी जायकवाडीकडे सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mula-water-dam2

सामना प्रतिनिधी । नगर

मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी अखेर आज नगरमधील मुळा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले. मुळा धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडण्यात आले असून मुळा ते जायकवाडी 95 किलोमीटरचा प्रवास करून तीन दिवसांनी तिथे पोहोचेल.

सध्या धरणात 18 टीएमसी पाणी साठा शिल्लक असून 1.90 टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आज मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटबंधारे विभागाने सकाळपासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यातून झालेला मोठा विरोध पाहता त्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

नाशिकच्या गंगापूर आणि दारणाचेही दरवाजे उघणार

नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीला सकाळी 10 वाजता पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

नाथसागराला इतके पाणी मिळणार

मुळामधून 54 दशलक्ष घनमीटर (1.90 टीएमसी), प्रवरामधून 109 दशलक्ष घनमीटर (3.85 टीएमसी), गंगापूर धरणातून 17 दशलक्ष घनमीटर(0.60 टीएमसी), दारणा धरणातून 57.50 दशलक्ष घनमीटर(2.04 टीएमसी असे एकूण 254 दशलक्ष घनमीटर (8.99 टीएमसी) पाणी सोडला जाणार आहे.

निळवंडे धरणातून दोन वेळा पाणी सोडले

निळवंडे धरणातून सकाळी 8.30 वाजता 6000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर 12 वाजता 9305 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती नगर पाटबंधारे विभागाचे
कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे.