
सामना ऑनलाईन । वरोरा
वरोरा तालुक्यात शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. वसंत जांभुळे (32) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महावितरणच्या चुकीच्या धोरणामुळे वसंत याला प्राण गमवावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वसंत याच्या कुटुंबाला रुपये 15 लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी आणि वरोरा येथील मुख्य अभियंता राठी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती.
त्यानुसार, वसंत यांचे वडील नामदेव जांभुळे यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अभियंता राठी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जंगली श्वापदांपासून हानी रोखण्यासाठी आणि सध्या सुरू असलेल्या टी1 या सर्च ऑपरेशन दरम्यान विजेची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत फेज 3चा विद्युत पुरवठा करावा, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तरीही पूर्वीप्रमाणेच विद्युत पुरवठा सुरू राहिल्याने मुलाचा बळी गेल्याचा आरोप या तक्रारीत नामदेव यांनी केला आहे. नामदेव यांच्यासह शिवसेनेचे नेते राजू चिकटे व शिवसैनिकांनी या प्रकरणी ठाण्यात तक्रार दिली आहे.
summary- farmer died with shock in varora





























































