याद्यांच्या घोळ कायम, राठोडांनी मांडली निवडणूक अधिकार्‍यांकडे पुन्हा तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महानगरपालिकेच्या मतदार याद्यांच्या घोळाची प्रक्रिया थांबायला तयार नाही. शुक्रवारी उपनगरातील अनेक याद्यामध्ये असलेल्या घोळाच्या संदर्भात शिवसेनेचे नेते अनिल राठोड मनपाचे उपायुक्त प्रदिप पठारे यांची भेट घेऊन तात्काळ याद्या दुरुस्त करुन द्या, अशी मागणी केली.

मतदार याद्यांतील घोळ हा मोठ्या प्रमाणावर आहेत. यावर 1895 हरकती दाखल झाल्या आहेत. बीएलओना दिलेली कामे त्यांनी व्यवस्थीत रित्या न केल्याने असे घोळ झाले आहेत. तर विधानसभेची यादी फोडताना अनेक बाबी या याद्यात चुकीच्या झाल्या आहेत. यातुन प्रशासनाची डोकेदुखी वाढतच गेली आहे.

आज उपनगरातील बोल्हेगाव, गांधीनगर या भागामध्ये आलेल्या समस्या संदर्भात माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राजेश कातोरे, दत्ता सप्रे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आज राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त पठारे यांच्याकडे या भागातील अनेक समस्या मांडल्या आहेत. जे नागरीक गांधी नगर भागात राहत नाही अशांची नांवे शेजारच्या प्रभागातील याद्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. बीएलओनी कोणतीही पाणी केली याच भागामध्ये बीएलओंना धमक्या देण्याचे प्रकार घडलेले आहेत. ही बाब प्रशासनाच्या दृष्टभकोणातून गंभीर आहे. कोणत्याही मतदारांवर आम्हाला अन्याय करायचा नाही, मतदान घडले पाहिजे, मात्र जी मानसे या भागात राहतच नाहीत त्यांनी नावे आली कशी आणी कोठून, ज्यावेळी प्रभाग रचना जाहीर झाली त्याच वेळेस तुम्ही दिलेल्या नकाशाद्वारे याद्या फोडण्याचे काम करायचे होते असे ही राठोड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मदन आढाव व सप्रे यांनी बोल्हेगाव परिसरातध्ये देखील अशाच प्रकारचा घोळ करण्यात आला आहे. सुमार 200 ते 300 नांवे ही या याद्यांमध्ये घुसवण्यात आली आहेत. आम्ही सर्व प्रकारचे पुरावे देण्यास तयार असतानाही बीएलओ मात्र त्यावर काहीच उपाय योजना करण्यास तयार नाही, अंतीम यादी जाहीर होण्यपुर्वी तुम्ही याची दखल घेवून तात्काळ या यादया दुरुस्त करुन घ्याव्यात असे चर्चेत सांगितले. यावेळी उपायुक्त पठारे यांनी बीएलाएंना आदेश आम्ही दिलेल्या आहेत. मात्र, याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत, विधानसभेच्या प्रारुप याद्या आम्ही घेवून त्याची विभागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्याची निश्‍चितच दखल घेतली जाईल असे ते म्हणाले.