दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी परीक्षा फी माफ करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यास सांगण्यात आले असून आवश्यक असल्याने निधीची तरतूद करण्यासही उच्च शिक्षण संचालकांना सांगण्यात आले आहे. सर्व विद्यापीठे व परीक्षा मंडळांना याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.