
सामना प्रतिनिधी, मुंबई
चित्रपट निर्माते पंकज निहलानी यांच्या आगामी ‘रंगीला राजा’ या चित्रपटातील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याने निर्मात्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी सेंट्रल बेर्ड फॉर फिल्म सर्टीफिकेशन (सीबीएफसी) विरोधात याचिका दाखल करण्यात आली असून उद्या मंगळवारी त्यावर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अभिनेता गोविंदा याची मुख्य भूमिका असलेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटाची निर्मिती पंकज निहलानी यांनी केली असून चित्रपटात कोणतींही आक्षेपार्ह किंवा अश्लील दृश्ये नसताना सेन्सॉर बोर्डाने 20 दृश्ये अन्यायकारकपणे वगळली असल्याचा आरोप निहलानी यांनी याचिकेत केला आहे. सीबीएफसीच्या प्रमुखांवरही निहलानी यांनी आरोप केले आहेत. सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी असून राजकारणाशी ते प्रेरित आहेत. एखाद्या चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड 21 दिवसांत निर्णय घेते, परंतु या प्रकरणात मात्र क्रिनिंग कमिटीने 40 दिवस घेतल्याचे निहलानी यांचे म्हणणे आहे.
summary- pankaj nihalani seeks hc help to oppose sensor board over rangeela raja



























































