विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मनमाड

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव आणि विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते व माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड (95) यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. उद्या मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर मनमाड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर 1974 साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात माधवराव गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱयांना न्याय मिळवून दिला.

1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते. 1985 साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता.

summary- madhavrao gaikwad passed away