
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सोमवारी गावात स्वच्छता अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानात ग्रा.पं. सह ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
श्री देवी भराडी मंदीर, ग्रामपंचायत, समर्थवाडी, डॉ. आंबेडकर पुतळा या रस्त्यांसह मंदिर व ग्रा.पं परिसराची साफसफाई यावेळी करण्यात आली. सरपंच अमेय धुरी, उपसरपंच ममता धुरी, ग्रामसेविका सविता आडेलकर, सदस्य अंकुश वरावडेकर, रमेश मेस्त्री, गणेश गाड, मंचजी माधव, महेश्वरी धुरी, ईशा परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष विपूल धुरी, पोलिस पाटील प्रशांत धुरी आदींसह सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी, ग्रामस्थ व महिलावर्गाने या अभियानात सहभाग घेतला. रस्त्यालगतच्या जमीन धारकांच्या सहकार्यामुळे रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे शक्य झाले तसेच निलेश पालव, प्रभाकर गाड, मोहन गाड, सचिन गवंडे व पुरूषोत्तम कदम या ग्रामस्थांनी ग्रासकटर उपलब्ध करून दिल्याने कमी वेळात जास्त काम करणे शक्य झाले.



























































