सोप्या गोष्टी मधुमेहासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोप्या गोष्टी मधुमेहासाठी

  • मधुमेहींसाठी दह्यापेक्षा ताक उत्तम आहे, ताजे व गोड ताक जिरेपूडीसह जेवणात आणि जेवणानंतर प्यावे. पाणी जेवणादरम्यान प्यावे, जेवणानंतर पाणी प्यायल्याने पचन मंदावते. फ्रीजमधील थंड पाणी आणि शीतपेये टाळावीत.
  • जेवण पूर्ण झाल्यावर लगेचच कष्टाची कामे करू नये. दुपारच्या जेवणानंतर झोपू नये. दिवसा झोपल्याने मधुमेहाच्या तीव्रतेत वाढ व अपचन होण्याची शक्यता आहे. सायंकाळी एखादे फळ खाऊ शकता.
  • रात्री लवकर भोजन करावे. आहार मर्यादित , पचायला हलका असावा. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवण आणि झोप यात किमान तासभर अंतर असावे .
  • मनाला आनंद देणारा एकतरी छंद असावा. मन शांत होईल असे संगीत ऐकावे.
  • व्यसनांपासून दूर राहावे , आनंदी आणि सकारात्मक विचारांनी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.