मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला-उबेरचा संप मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ola-uber-protest

सामना ऑनलाईन,मुंबई

ओला-उबेर कंपन्यांकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने चालक-मालकांनी पुकारलेला संप आज अखेर मागे घेण्यात आला. अधिवेशनानंतर दरवाढीविषयी निर्णय घेण्यात येईल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओला-उबेर चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने विधिमंडळात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर  पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे ओला-उबेर चालवणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाहीत. याविषयी मुख्यमंत्र्यांनी ओला-उबेर चालक-मालक आणि वाहतूक अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन याविषयी मार्ग काढावा. आवश्यकता भासल्यास यासाठी केंद्रीय मंत्र्यांचे सहाय्य घेऊन ओला-उबेर चालक-मालक यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने संप मागे घेत असल्याचे ते म्हणाले.