बिग बी यांच्या हस्ते ‘मैं हुआ तेरा’ या गाण्याचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संगीतकार आदेश श्रीवास्तव आणि अभिनेत्री विजयता पंडित यांचा मुलगा अवीतेश श्रीवास्तव ऊर्फ अवीच्या ‘मैं हुआ तेरा’ या पहिल्या-वहिल्या गाण्याचे अनावरण नुकतेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते ज्योर्जियो तुइन्फोर्ट यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या गाण्यासोबतच रेमो डी’सुझा यांनी दिग्दर्शित केलेल्या व्हिडीओचे अनावरणही बिग बींच्या हस्ते पार पडले. लॉस एंजल्समधील हॉलीवूड अकादमीचा विद्यार्थी, अवी याने शुजीत सरकारच्या ’पिकू’ व ’रंगून’ चित्रपटात विशाल भारद्वाजला सहकार्य करून आपल्या कलेचे दर्शन घडविले होते. ‘हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. माझे वडील या दिवसाची खूप वाट पाहत होते, असेही तो पुढे म्हणाला.