शिवद्रोही छिंदम हद्दपार, प्रांताधिकारांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shripad-chhindam

सामना  प्रतिनिधी । नगर 

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्या बाबतचे आदेश आज प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी बजावले आहे. हद्दपारीमध्ये ओंकार कराळे, मनोज कराळे, भाऊसाहेब कराळे, दिपक खैरे यांचा समावेश आहे.

महापरगपालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या मागील असलेले गुन्हे लक्षात घेऊन संबंधितांना हद्दपार व तडीपार करण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने धडक पावले उचलले आहे. त्या बाबतचे प्रस्ताव त्यांनी  प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केले आहे. त्या संदर्भात त्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

या अगोदर 147 जणाविरुध्द कारवाई केली होती.  आज नव्याने अटी व शर्तीनुसार शहरातील अनेकांवर पुन्हा कारवाई केली आहे. यामध्ये चंद्रकांत उजागरे, भुपेद्र परदेशी, नरेंद्र कुलकर्णी, सुवेंद्र गांधी, कुमार वाकळे,  दिपक आडेप यांच्यासह चौदा जणांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, नगर शहरात मनपा निवडणुकीसाठी शिवद्रोही श्रीपाद छिंदम व त्याची पत्नी हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडणुक लढवत आहेत. छिंदम याच्यावर या आगोदरसुध्दा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे. या अगोदरसुध्दा त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी तात्पूरता दिलासा देऊन मुभा देण्यात आली होती. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर छिंदमला हद्दपार केलयामुळे आता तो प्रचारात उतरणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.