इंग्लंडमधील वन डे वर्ल्ड कप सहा महिन्यांआधीच ‘हाऊसफुल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडमध्ये पुढल्या वर्षी 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वन डे वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. क्रिकेटविश्वातील प्रतिष्ठsची समजली जाणारी स्पर्धा सुरू होण्यासाठी अद्याप सहा महिने बाकी आहेत. मात्र या स्पर्धेतील लढतींची बहुतांशी तिकिटे विकली गेली असल्याची माहिती आयसीसीकडून बुधवारी देण्यात आली आहे. फक्त 3500 तिकिटे बाकी असल्याचे पुढे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. एकूणच काय सहा महिन्यांआधीच वर्ल्ड कपच्या लढती ‘हाऊसफुल्ल’ झाल्या आहेत.

इंग्लंडमध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपमध्ये 48 सामने होणार आहेत. या स्पर्धेतील हिंदुस्थानच्या सर्व लढतींची तिकिटे विकली गेली आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यामध्ये 16 जूनला ओल्ड ट्रफोर्ड येथे होणाऱया लढतीचीही सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यजमान इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 30 मे रोजी ओव्हलवर सलामीचा सामना रंगणार असून 14 जुलैला लॉर्डस् येथे जेतेपदाची लढाई रंगणार आहे.