
सामना प्रतिनिधी । जालना
जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक बुधवारी 5 डिसेंबरला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात हे पथक बदनापूर तालुक्यातील आणि जालना तालुक्यातील बेथलम या गावांना भेटी देवून पाहणी करणार आहे. तसेच शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहे. केंद्र शासनाच्या या पथकामध्ये निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव व एस.एन.मिश्रा यांचा समावेश आहे. या पथकासोबत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे रांजणकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदी उपस्थित राहणार आहेत.



























































