चंद्रपूरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच स्विकारताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

उर्वरित बिलाची रक्कम लवकर देण्यासाठी सावली येथील ग्रामविकास अधिकारी संदीप सब्बनवार यांनी 4 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने लाच स्विकारताना सब्बनवार यांना अटक केली. मौजा व्याहाड बुज येथे ग्रामपंचायत भवन बांधकाम जनसुविधा योजना वर्ष 17-18 अंतर्गत ई टेंडरिंग नुसार अंकुश वरगंटीवार याना काम मिळाले. त्यांनी या कामाचे सर्व अधिकार तक्रारदार यांना दिले होते. ग्रामपंचायत भवन कामाचे स्लॅब लेव्हलवर आले असून या बांधकामाची पाहणी करण्याकरिता ग्रामविकास अधिकारी आले होते. त्यांनी तक्रारदाराकेड काढलेल्या बिलाचा मोबदला म्हणून 4 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यास पुढील बांधकामाचे बिल काढण्यास अडथळा निर्माण होणार असे सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून 4 डिसेंबरला लाचलुचपत विभागाने सापळा रचत तडजोडीअंती 3500 रुपये स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी सब्बनवार यांना रंगेहाथ अटक केली. ही कार्यवाही चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक डी. एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौबे, महेश मांढरे, सुभाष गोहोकार, अजय बागेसर, रवी धेंगळे, राहुल ठाकरे यांनी केली.