
मंगेश पाटील | वासिंद
छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून नाशिक कडे निघालेल्या राज्यराणी एक्सप्रेसवर एका अज्ञात समाजकंटकाने दगड भिरकावल्याची घटना रात्री ८,३० च्या सुमारास वासिंद आटगाव च्या दरम्यान घडली’ . या घटनेत इंजिनाची काच फुटून तिचा तुकडा मोटरमन च्या डोळ्यात घुसला, मोटरमन ने एक्सप्रेस वाटेत ना थांबवता ती थेट कसारा येथे थांबवून याबाबतची तक्रार दिली. दरम्यान या मार्गावर वारंवार होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
मोटरमन व्ह इ चित्तारे हे राज्यराणी एक्सप्रेस घेऊन नासिक कडे निघाले. एक्सप्रेस आटगाव जवळ येताच समोरून एक्सप्रेसच्या दिशेने एका अज्ञात समाजकंटकाने मोठा दगड भिरकावला,हा वजनदार दगड मोटरमन केबिन ची काच फोडून आत घुसला, या घटनेत काचेचा एक बारीक तुकडा मोटरमन चित्तारे यांच्या डोळ्यात घुसला, परंतु त्यांनी प्रसंगावधान राखून एक्सप्रेस न थांबवता पुढे नेली व ती कसारा रेल्वे स्टेशन वर थांबवली. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले नंतर एक्सप्रेस नासिक कडे रवाना झाली.



























































