
उदय जोशी । बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून राज्य कार्यकारिणीतील युवासेना पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा युवा संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत बीड जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्यासोबतच शाखा व कॉलेज कक्षांची स्थापना, पदाधिकारी बैठक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना किराण्याच्या वाटप करण्यात आले. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी जिल्ह्यासह मराठवाड्यात पडत असलेला दुष्काळ हटवणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत शिवसेना या भीषण दुष्काळात दुष्काळग्रस्तांसोबत असून यापुढेही शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरूच राहील असे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना म्हटले. यावेळी व्यासपीठावर युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडें, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर, वैभव आजलेसह युवासेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
युवासेनेकडून मराठवाड्यात दुष्काळ व बेरोजगारी या विषयावर संवाद दौरा आयोजित करण्यात आला असून या दौऱ्यांतर्गत बीड जिल्ह्यातील युवक व शेतकऱ्यांसोबत युवासेना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सदस्य अंकित प्रभू यांच्या हस्ते बलभीम महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे कॉलेज कक्ष, शहरातील पेठ बीड विभाग व प्रभाग क्र 11 भक्ती कन्ट्रक्शन, चौसाळा शहर, गेवराई येथील बागपिंपंळगाव व शहरातील सरस्वती कॉलनी येथे मुस्लिम युवकांकडून युवासेना शाखा स्थापना करण्यात केली. यानंतर या दौऱ्यात शिवसेना बीड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किराण्याच्या वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांशी संवाद साधत यापुढेही शिवसेना व युवासेनेच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीचा ओघ असाच सुरु राहील असा शब्द देत कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बेरोजगारीवर बोलताना युवकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भूमिका आग्रही असल्याचे सांगितले.
जिल्ह्यासह मराठवाड्यातील सततच्या दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा निघणे अत्यावश्यक कुणीही आत्महत्या करून नये असे ते यावेळी म्हणाले. या वाटपावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विस्तारक राहुल लोंढे, निखिल वाळेकर, गणेशराजे भोसले, योगेश निमसे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगरसेवक हर्षद कारकर, अविष्कार भुसे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, वैभव आजले, सहसम्पर्कप्रमुख चंद्रकांत नवले, किसान सेना परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, हनुमान पिंगळे, हनुमान जगताप, भारत जगताप, जिल्हा सचिव जयसिंगमामा चुंगडे, तालुकाप्रमुख गणेश वरेकर, किरण चव्हाण, जिल्हा संघटक गोरख सिंघण, जिल्हा सहसंघटक रतन गुजर, विधानसभा प्रमुख नितीन धांडे, विधानसभा संघटक प्रा. रणजित आखाडे, शहरप्रमुख सुनील सुरवसे, पंढरीनाथ लगड, यशराज घोडके, महिला संघटक संगिता चव्हाण, विधानसभा संघटक उज्वलाताई भोपळे, शेख फर्जाना, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पुजारी, युवासेना विद्यार्थी कक्ष प्रमुख शेखर शिंदे, तालुकाप्रमुख राहुल साळुंके, साहिल देशमुख, शिवसेना शहर संघटक जितेश शिंदे, जब्बार शेख, उपशहरप्रमुख हनुमान पांडे, उपतालुकाप्रमुख सखाराम देवकर, युवासेना तालुकासमन्वयक संग्राम गव्हाणे, किरण आहेर, विधानसभाप्रमुख राहुल फरताळे, शहरप्रमुख सुरज चुंगडे, शुभम घोडके, राहुल घोडके, सुदर्शन मोरे आदींसह आजीमाजी शिवसेना – युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, आत्महत्याग्रस्तांचे कुटुंबीय आदींची उपस्थिती होती.

























































