वसुंधरा राजे यांचे देवीला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जयपूर

लोकसभेची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. यात तीन राज्यात काँग्रेसने भाजपला धोबीपछाड केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपला मागे टाकल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. यापार्श्वभूमीवर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सकाळीच बांसवाडा येथील त्रिपुर सुंदरी मंदिरात धाव घेतली आहे. जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत गाभाऱ्याबाहेर येणार नाही असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावून सांगितले आहे. गेल्या निवडणुकांच्या अंतिम निकालावेळीही राजे यांनी मंदिरात अशाच प्रकारे देवीला साकडे घातले होते.