अंगणवाडी सेविका दोन दिवस संपावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मानधनवाढीच्या मागणीसाठी येत्या 8 आणि 9 जानेवारी रोजी राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर जाणार आहेत. मानधनात वाढ न केल्याने अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी आझाद मैदानात मोर्चा काढला होता. या मागण्या मान्य न झाल्यास येत्या दोन दिवस राज्यभरातील अंगणवाड्या बंद ठेवण्याचा इशारा अंगणवाडी संघटनेने दिलाय. सरकारने संपाची दखल न घेतल्यास 11 ते 13 जानेवारी रोजी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी जेलभरो आंदोलन करणार आहेत.

आझाद मैदानावरील मोर्चात राज्यभरातील 10 हजार अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिक राजेश सिंह म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली होती. राज्य सरकार मानधनवाढीबाबत जीआरसुद्धा काढला. मात्र दोन महिने झाले तरी मानधन काढ देण्यात आलेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारद्वारे कुठलंही उत्तर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन आझाद मैदानात सरकारविरोधात निषेध व्यक्त केलाय.’

अंगणवाडी सेविकांचं मानधन 1,500 रुपये तर मदतनीसांचं मानधन 750 रुपये वाढवण्यात आले होते. ही वाढ अजून मिळाली नाही. याशिवाय राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 6,585 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. याबाबतही सरकार गंभीर नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिक भगकान दकणे म्हणाले, ‘ऑक्टोबरमध्ये मानधन वाढ मिळायला हवी होती, परंतु अजूनही ही वाढ राज्य सरकारने दिली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री, महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पत्र पाठवलंय, पण अजूनही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात 8 आणि 9 रोजी अंगणवाडी राज्यातील अंगणवाड्या बंद राहणार.’

काय आहेत मागण्या

  • अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी.
  • अंगणवाडी सेविकांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे.
  • सेवासमाप्ती लाभाच्या रकमेत तीन पटीने वाढ करावी
  • कर्मचाऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन योजना लागू करावी, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी रजिस्टर आणि अहवाल फॉर्म देण्यात यावा.