राफेल खटला; सुप्रीम कोर्टात आज फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rafel-deal

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि फ्रान्स यांच्या दरम्यान झालेल्या 36 राफेल खरेदी कराराचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली केला जावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर आज निर्णय होणार आहे.

याबाबत एकापेक्षा जास्त याचिका आल्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निकाल राखून ठेवला होता. दोन वकील तसेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी याचिका दाखल केली. त्याचबरोबर माजी मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या करारातील अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरही आज निर्णय दिला जाईल.