
सामना प्रतिनिधी । लातूर
निलंगा येथील गिरीजा नगर भागातील बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडले. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने पळवण्यात आले.
या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात लक्ष्मण किसन थोरमोटे (वय ३२) यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे ४७ हजार रुपयाचा ऐवज पळवण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आघाव या करीत आहेत.






























































