
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप हे शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले असून विधिवत लग्न आणि रिसेप्शन 16 डिसेंबरला होणार आहे. फुलराणी सायना नेहवाल हिने पती पी. कश्यम सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. या फोटो सोबत सायनाने माझ्या जीवनातील सर्वांत योग्य निवड… असे कॅप्शनही दिले आहे.
Best match of my life ❤️…#justmarried ☺️ pic.twitter.com/cCNJwqcjI5
— Saina Nehwal (@NSaina) December 14, 2018
सायना नेहवाल आणि पी. कश्यप हे गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. याच वर्षी दोघांनी आपल्या नात्याला सार्वजनिकरित्या कबूल केले होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही 16 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा होती, परंतु दोन दिवस आधीच सायना आणि कश्यपने कोर्ट मॅरेज करत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
























































