
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राफेल खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झालेली नाही असे सांगतानाच सीबीआय चौकशीची मागणी करणाऱया सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘देशाच्या चौकीदारापासून भीती होती म्हणूनच चौकीदार चोर है’ अशी बोंब ठोकण्यात आली असा आरोप त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध, पानी का पानी झाले आहे. राफेल प्रकरणात खोटा प्रचार करणाऱयांचे पितळ उघडे पडले आहे असे सांगून ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी खोटा प्रचार केला. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची आणि जवानांची माफी मागितली पाहिजे.
























































