‘सीएम चषका’ला तरुणी, गृहिणींचा दणदणीत प्रतिसाद, अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात सीएम चषकासाठी दणदणीत प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शनिवारी सीएम चषक स्पर्धेत भाग घेतला. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील खेतवाडीस्थित भगिनी सभागृह येथे सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी हातामध्ये बॅडमिंटन रॅकेट घेतले. त्यांच्या उपस्थितीमुळे महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले. या चषकाला गृहिणी आणि तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. याप्रसंगी आमदार मंगलप्रभात लोढा, नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी, ज्योत्स्नाबेन मेहता, सरिता पाटील, श्वेता मांजरेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.