शिवसेना-भाजप युती गरजेची, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणून शिवसेना-भाजप युती होणे गरजेचे आहे. आम्ही एकत्र लढलो तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे शिवसेनेशी युती करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. एका खासगी वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, राजकारणात आम्ही वेगवेगळे राजकीय पक्ष असलो तरी आम्ही भाऊ आहोत. त्यात मोठा भाऊ व लहान भाऊ कोण हे माध्यमांनीच ठरवावे, मात्र आगामी निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार असून युतीसाठी आम्ही पुढाकार घेऊ.

धनगर समाजाला आरक्षण
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची शिफारस अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देण्याची शिफारस केली जाईल. आर्थिकदृष्टया दुर्बल समाजाला पुढे घेऊन जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.