नगर पुन्हा हादरले! केडगावात अजून एक हत्याकांड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

वरचेवर होणाऱ्या हत्यांमुळे नगर जिल्हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आता पुन्हा एकदा नगर हत्येच्या प्रकरणाने हादरलं आहे. संतोष कचरू पाचारणे (राहणार केडगाव वय २५ वर्षे) या युवकाचा रात्री ११ च्या सुमारास नगर पुणे रोडवरील अंबिका हॉटेलजवळ हत्या झाली.

बाळू शांताराम पाचारणे याच्याशी संतोष यांचे वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन संतोष यांला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. मयत संतोष आणि आरोपी बाळू हे दोघेही केडगावमधील हॉटेल अंबिकाच्या मागील वस्तीत राहतात. या घटनेवेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. दारूच्या नशेत त्यांच्यात भांडणे झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.