
सामना ऑनलाईन, ह्यूस्टन
एका तरूणीने तिच्या वाढदिवसाला चित्रीत केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. टिआना परेरा असं या तरुणीचं नाव असून तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत अवघ्या 40 सेकंदांमध्ये ब्रेकअप केलं आहे. या दोघांमध्ये काय घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा
टिआनाला सँटोसचं दुसऱ्या तरुणीसोबत असलेलं लफडं कळालं होतं आणि यामुळे ती संतापली होती. तिने सँटोसला धडा शिकवायचा निर्णय घेतला होता. तिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये तिने एक छोटंसं भाषण केलं. ज्यात ती म्हणाली की मला तुझ्यापेक्षा जास्त चांगला प्रियकर मिळू शकतो. “मला कळालं आहे की तू एका मुलीसोबत अश्लील संभाषण करतोयस, त्याची काही रेकॉर्डींगही माझ्याकडे आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत ब्रेकअप करतेय, आता तू इथून चालता हो” अशा शब्दात टिआनाने सँटोसला तिच्या पार्टीमधून हाकलून दिलं. टिआनाने हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन लाख 30 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत तर हे ट्विट 58 हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आलं आहे.



























































