
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी येथे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग मतदार साक्षरता क्लब व जिल्हा निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार साक्षरता व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांतधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुखटणकर, रत्नागिरीचे तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आनंद सामंत, राज्यशास्त्र विभागाचे निलेश पाटील आदि मान्यवंर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार म्हणाले, निवडणुक आयोगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा. गावोगावी भेटी द्याव्यात, मोठया शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी EVM, VVPAT मशीन उपलब्ध करुन देऊन प्रशिक्षीत टिमद्वारे मतदारांचे शंखाचे समाधान होत नाही तोपर्यंत माहिती द्यावी अशा सूचना आहेत. जेणेकरुन चांगल्या प्रकारची जनजागृती मतदारांमध्ये होईल आणि लोकशाही सदृढ करण्याच्या दृष्टिने सर्व मतदारांचे शंखांचे समाधान करणे आवश्यक आहे. आज आपण जी EVM, VVPAT मशीन बद्दल माहिती घेतली ती आणखी इतर लोकापर्यंत पोहचावी, मतदान प्रक्रीयेबाबत आपल्या प्रत्येक शंखेचे समाधान करुन घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाकडून राबविण्यात येणार उपक्रम, त्यांचा प्रशासनाला सहकार्य बाबत त्यांचे कौतुकही केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुखटणकर म्हणाले, निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेले EVM, VVPAT मशीनबद्दल जनजागृती केल्यामुळे मतदारमध्ये तसेच नवमतदारामध्ये लोकशाहीबद्दलचा विश्वास अजुन दृढ होईल. मतदार जनजागृत्तीचे कार्यक्रम या महाविद्यालयाकडून नेहमीच घेण्यात येत असतात. आपण आज जे प्रात्यक्षित बघतले त्यामुळे मतदार प्रक्रीया ही अचुक व सुरक्षित असल्याचा विश्वास आपल्यात आला असेल. मतदान प्रक्रीयेबद्दल जास्तीत जास्त जनजागृत्ती करण्याचा आपण प्रयत्न करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रांतधिकारी अमित शेडगे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना EVM, VVPAT मशीनबद्दल प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंखेचे समाधान केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी EVM, VVPAT वापरुन अभिरुप मतदानही केले. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच प्राध्यापक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.
































































