
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरात दोन ठिकाणी छापे घालून अमंली पदार्थाविरोधी कारवाई केली. गांजा आणि ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी एस.टी.तून येणारा चार किलो गांजा पकडला होता. त्या कारवाई नंतर डिबी स्कॉडने आज रत्नागिरी शहरात कारवाई केली. थिबापॅलेस परिसरात छापा घालत गांजा पकडला. या कारवाईत आकाश उर्फ सलमान डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मच्छिमार मार्केट परिसरात कारवाई करत ४६ मिलीग्रॅम ब्राऊन शुगर पकडली. याकारवाईत अडऱ्या उर्फ अश्रफ शेख याला ताब्यात घेतले आहे. व्हिक्टर श्वानने अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली.

























































