
सामना ऑनलाईन । मुंबई
ठाकरे या चित्रपटाचा ट्रेलर २६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटावर आधारित काही व्हिडीओ तयार करण्यात आले आहे. रविवारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता, त्यात सचिन तेंडूलकरसह सामान्य माणसांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना दिसत आहे. आता संजय दत्त याचा बाळासाहेंबद्दल प्रतिक्रिया देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
बाळासाहेब हे माझ्यासाठी वाघ होते अशी प्रतिक्रिया संजय दत्तने दिली आहे. तसेच “देशावर प्रेम करावे हे मी बाळासाहेंबाकडूनच शिकलो, खरं बोलत रहावे हेच मी त्यांच्याकडून शिकलो आणि त्यांनीही आयुष्यभर तेच केले. ते जनतेचे होते परंतु साहेब हे माझ्यासाठी नेमहीच एक वाघ होते.” असे संजय दत्त म्हणतो.
ठाकरे हा चित्रपट जानेवारीमध्ये मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





























































