
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच असून आज खार आणि कांदिवलीत भीषण आग लागण्याच्या घटना घडल्या. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखोंची वित्तहानी झाली.
खारमधील राजस्थान रेस्टॉरंट येथील न्यू ब्युटी सेंटर सलून या सात मजली इमारतीमधील बेसमेंटमध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत बेसमेंटमधील इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रिक वायरिंग, कॉस्मेटिक वस्तू जळून खाक झाल्या. अकघ्या अर्ध्या तासात आग भडकली व लेव्हल – 2ची झाली. तर आग आणखीनच भडकल्याने 11.58 वाजताच्या सुमारास लेक्हल – 3ची झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जकानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. या वेळी जवानांनी थर्मल इमेजिंग कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या कामात मोठी मदत झाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर इंजिन, 6 जम्बो कॉटर टँकर वापरण्यात आले. दुपारी 3 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. दरम्यान, या दोन्ही आगी कशामुळे लागल्या याचे कारण स्पष्ट झाले नसून अधिक तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.
माहीमच्या आगीत एक गंभीर
माहीम येथील रामगड झोपडपट्टीतील एका रूममध्ये रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. यामध्ये आजम खान (14) हा 95 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर रेहाना खातून (50) किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कपडय़ाच्या कारखान्यात भडका
कांदिकली एमआयडीसीजवळील दामू नगर झोपडपट्टी भागात दुपारी 3.50 वाजताच्या सुमारास एका कपडय़ाच्या कारखान्यात आगीचा भडका उडाला. या ठिकाणच्या कपडय़ांनी पेट घेतल्याने अर्ध्या तासातच आग भडकली व लेव्हल -2ची झाली. या आगीची महिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन 4 फायर इंजिन व 4 जम्बो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
























































