
सामना प्रतिनिधी, मुंबई
गोरेगावमध्ये बांधकाम सुरू असलेली दोन मजल्यांची इमारत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये ढिगाऱयाखाली अडकल्याने सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोरेगाक पश्चिम येथील मोतीलाल नगरमध्ये म्हाडा कसाहतीत या दुमजली इमारतीचे काम सुरू होते. मात्र सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळली. यावेळी या ठिकाणी काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ढिगाऱयाखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले, मात्र या घटनेत तीन जण ठार झाले. बचावकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
मृत, जखमींची नावे
या दुर्घटनेत श्रवणकुमार गोरेमंडल (27), सुभाष चव्हाण (38) यांच्यासह आणखी एक जण ठार झाला. तर या दुर्घटनेत मंगल बनसा (35) मुन्ना शेख (30), शिनू (35), हरी कडार (3), शंकर पटेल (21), सरोजा कडार (24), रमेश निशाद (32) हे जखमी झाले आहेत. त्यांच्याकर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.



























































