
सामना ऑनलाईन। तुमकूर
कर्नाटकमधील दुर्गम भागांमध्ये जाऊन महिलांची प्रसूती करणाऱ्या पद्मश्री विजेत्या जननी अम्मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा (98) यांचे निधन झाले आहे. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात जन्माला आलेल्या नरसम्मा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात 15 हजार महिलांची सुरक्षित प्रसूती केली होती. येथील दुर्गम भागात पाऊस, हिंस्त्र श्वापद यांची तमा न बाळगता नरसम्मा अडलेल्या महिलेची सुटका करण्यासाठी जायच्या. त्यामुळे येथील आदिवासी त्यांना जननी अम्मा म्हणून संबोधित करत असतं.
नरसम्मा यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक क्षेत्रात अतुलनिय योगदान दिल्याबद्दल त्यांना सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरवले होते. कुठल्याही वैद्यकिय मदतीशिवाय त्या महिलेची प्रसूती करायच्या. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. तुमकुर विश्वविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले होते.
























































