हिंदुस्थान नाही तर कॅनडा आहे माझं पहिलं घरं – अक्षय कुमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कॅनडा

‘टॉयलेट-एक प्रेम कथा’, ‘एअरलिफ्ट’, ‘गोल्ड’ अशा देशभक्तीवर आधारित चित्रपटातून आपले देशप्रेम दाखवणारा बॉलीवूड स्टार अक्षय कुमार सध्या ट्रोल झाला आहे. हिंदुस्थान नाही तर कॅनडा हेच माझ पहिलं घर आहे. चित्रपट निवृत्तीनंतर मी येथेच स्थायिक होणार आहे. असं अक्षयनं नुकतच जाहीर केलं. यामुळे त्याचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. अक्षय देशद्रोही असून त्याचं देशप्रेमही खोटं आहे. पैसा कमावण्यासाठी तो देशभक्त असल्याचे दाखवतो. असा आरोप करत चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कॅनडामध्ये एका कार्यक्रमासाठी गेला होता. त्यावेळी तेथे बोलताना त्याने कॅनडाचं कौतुक करायला सुरुवात केली. टोरँटो हेच माझं घर आहे. निवृत्तीनंतर मी येथेच स्थायिक होणार आहे. असं अक्षयने म्हटले. नेहमी देसभक्तीचे गोडवे गाणाऱ्या अक्षयकडून चाहत्यांना हे विधान अनपेक्षित होते. यामुळे संतप्त नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याच्या देशभक्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उगारले आहे. विकिपिडीयावरही अक्षयच्या प्रोफाईलमध्ये तो हिंदु्स्थानमध्ये जन्माला आलेला कॅनडेयिन नागरिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरूनही अनेकवेळा अक्षयला लोकांनी ट्रोल केले होते.