
> आपला जोडीदार ः दिनकर गुरव
> लग्नाचा वाढदिवस ः 24 जून 1974
> आठवणीतला क्षण ः जेआरडी टाटांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहायची म्हणून त्यांनी शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ऑफिसला दिले. या दोन्ही दिवशी त्यांनी व त्यांच्या स्टाफने काम केले. हा दिवस मला लक्षात राहिलाय.
> त्यांचे दोन शब्दात कौतुक ः मनमोकळा, हसरा स्वभाव. कुणालाही चटकन आपलेसे करतात. सतत कामात असतात.
> स्वभावाचे वैशिष्टय़ ः कुणालाही न दुखवणे, गरजूंना मदत करणे.
> त्यांचा आवडता पदार्थ ः मोदक, पुरणपोळी, केळफुलाची भाजी.
> वैतागतात तेव्हा ः सहसा वैतागत नाहीत. पण चिडले की त्यांचे ते उरत नाहीत. परंतु थोडा वेळच. नंतर शांत होतात.
> त्यांच्यातली कला ः इंग्रजीची प्रचंड आवड. आजही वाचन म्हणून डिक्शनरी वाचतात.
> त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ ः ‘त्या तिथे पलीकडे..’
> तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान ः स्वतःच्या श्वासाइतके.
> आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट ः लग्न झाल्यावर मी ठाण्याला ऍपलॅबमध्ये नोकरी करत होते. तेव्हा माझे ऍपेंडिक्सचे ऑपरेशन झाले. ऍनेस्थेशिया जास्त दिला गेल्यामुळे माझे काही खरे नव्हते. त्यावेळी डॉक्टरांचाही संप होता. परंतु त्यांच्या आणि मुलांच्या प्रचंड प्रयत्नाने आणि तीक्र इच्छेमुळेच मी जगले. मला पुनर्जन्म मिळाला. त्यांचे आभार मानायचे आहेत.





























































